Ad will apear here
Next
पंतप्रधानांना मिळालेल्या भेटवस्तूंचा लिलाव
ऑनलाइन सहभागही शक्य; मिळालेला निधी ‘नमामि गंगे’साठी देणार


नवी दिल्ली :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशभरातून मिळालेली स्मृतिचिन्हे, मानचिन्हे आणि भेटवस्तू आता तुमच्या घरातही असू शकतात. होय! हे खरे आहे. कारण पंतप्रधानांना मिळालेल्या विविध स्मृतिचिन्हांचा आणि भेटवस्तूंचा लिलाव आयोजित करण्यात आला असून, त्यातून उभा राहणारा निधी ‘नमामि गंगे’ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी दिला जाणार आहे. हा प्रत्यक्ष लिलाव नवी दिल्लीत असून, त्यानंतर देशभरातील नागरिकांसाठी ऑनलाइन लिलावही आयोजित करण्यात आला आहे. 

नवी दिल्लीच्या ‘नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट’ने केंद्रीय संस्कृती मंत्रालयाच्या सहकार्याने २७ आणि २८ जानेवारी २०१९ रोजी दुपारी १२नंतर हा लिलाव आयोजित केला आहे. ‘नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट’च्या इमारतीतच हा लिलाव होणार आहे. २९ ते ३१ जानेवारी २०१९ या कालावधीत ऑनलाइन लिलाव होणार असून, प्रत्यक्ष लिलावात विक्री न झालेल्या भेटवस्तू ऑनलाइन खरेदी करता येतील. त्यासाठी https://pmmementos.gov.in हे खास पोर्टल तयार करण्यात आले आहे.

पंतप्रधानांना मिळालेल्या विविध प्रकारच्या सुमारे १९०० भेटवस्तू सध्या ‘नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट’मधील ‘जयपूर हाउस’मध्ये ठेवण्यात आल्या असून, त्या लोकांना पाहण्यासाठी खुल्या आहेत. तसेच https://pmmementos.gov.in या पोर्टलवरही त्या पाहता येतात. या भेटवस्तूंमध्ये चित्रे, शिल्पे, शाली, विविध प्रकारच्या पगड्या, जॅकेट्स, पारंपरिक वाद्ये आदींचा समावेश आहे. 

पंतप्रधानांना मिळालेल्या भेटवस्तू योग्य ठिकाणी जाव्यात आणि त्यातून ‘नमामि गंगे’ या गंगा नदीच्या संवर्धनासाठीच्या प्रकल्पामध्ये लोकांचाही हातभार लागावा, असा या लिलावामागचा हेतू आहे. 


 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/AZLDBW
Similar Posts
बॉलीवूड सितारे जेव्हा पंतप्रधानांना भेटतात... चित्रपट निर्माते करण जोहर यांच्या नैतृत्वाखाली बॉलीवूडमधील अनेक सिताऱ्यांनी नुकतीच दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीत देशाच्या विकासात चित्रपट इंडस्ट्रीचे कसे योगदान असेल, यावर चर्चा करण्यात आली. या सगळ्या कलाकारांनी या वेळी मोदी यांच्यासोबत काढलेला फोटो, खुद्द मोदी यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे
नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीप्रीत्यर्थ पुण्यात जल्लोष पुणे : भारताचे १५ वे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी, ३० मे २०१९ रोजी शपथ घेतली. सलग दुसऱ्यांदा ते या पदावर विराजमान झाले आहेत. त्यांच्या शपथविधी सोहळ्याप्रीत्यर्थ पुण्यात ठिकठिकाणी मोदी समर्थकांनी जल्लोष केला.
मोदी सरकारच्या शपथविधीवेळी रत्नागिरीत जल्लोष रत्नागिरी : फटाक्यांची आतषबाजी, ढोल-ताशांचा गजर आणि ‘मोदींचा विजय असो’, ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’ अशा जल्लोषपूर्ण वातावरणात रत्नागिरीत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शपथविधी सोहळा साजरा करण्यात आला.
नेताजींच्या पराक्रमाच्या साक्षीदार वस्तूंचे लाल किल्ल्यात संग्रहालय नवी दिल्ली : भारतीय स्वातंत्र्ययुद्धाशी संबंधित असलेली तीन संग्रहालये लाल किल्ल्यात सुरू करण्यात आली असून, २३ जानेवारी २०१९ रोजी त्यांचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. ही संग्रहालये नेताजी सुभाषचंद्र बोस आणि आझाद हिंद सेना, जालियनवाला बाग हत्याकांड आणि १८५७चे स्वातंत्र्यसमर या विषयांना वाहिलेली आहेत

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language